अश्लिल फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याने १७ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

A 17-year-old girl from Murshidabad got a fight on Sunday with her friend.

मुर्शिदाबादमधील १७ वर्षांच्या मुलीचे तिच्या मित्राशी रविवारी भांडण झाले. तो २१ वर्षांचा आहे. भांडणानंतर त्याने मुलीचे अश्लिल छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले.

महा न्यूज नेटवर्क :- पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे १७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मित्राला ताब्यात घेतले असून मुलीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केल्यावर त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मुर्शिदाबादमधील १७ वर्षांच्या मुलीचे तिच्या मित्राशी रविवारी भांडण झाले. तो २१ वर्षांचा आहे. भांडणानंतर त्याने मुलीचे अश्लिल छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले. समाजात बदनामी होईल, असा भीतीपोटी त्या मुलीने आत्महत्या केली. तुर्तास अपघाती मृत्यूची नोंद केली असून मुलीच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करताच मुलाला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. हा ‘रिव्हेंज पॉर्न’चा प्रकार आहे, असे पोलिसांनी नमूद केले.

भारतात रिव्हेंज पॉर्नच्या घटना वाढत असून गेल्या आठवड्यात इंदौरमधील १७ वर्षांच्या आत्महत्या केली होती. शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून ब्लॅकमेल आणि छळ केल्याने मुलीने आत्महत्या केली. तर त्यापूर्वी मार्चमध्ये पश्चिम बंगालमध्येच ३० वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली होती. महिलेचा मोबाईल हरवला होता. हा मोबाईल तीन तरुणांना सापडला. त्यांनी मोबाईलमधील फोटोंच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल केल्याने महिलेने आत्महत्या केली.