अभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव तसेच अभिनेते असलेले आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 महा नुज्य नेटवर्क :-मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव तसेच अभिनेते असलेले आदेश बांदेकर यांना  राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. अद्यापही बांदेकर हे शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत.

मध्य प्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यामध्ये भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. मात्र यातील भय्यू महाराजांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाकारला होता.

दरम्यान, आदेश बांदेकर यांनी दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता.