नागपुरात दुचाकीच्या धडकेत महिलेचा करुण अंत

भरधाव दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा करुण अंत झाला. मंगला योगी उईके (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

महा नुज्य  नेटवर्क
नागपूर : भरधाव दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने एका महिलेचा करुण अंत झाला. मंगला योगी उईके (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या रविनगरात पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या आॅफिसर बंगलोतील आऊट हाऊसमध्ये राहात होत्या. १८ जूनला सायंकाळी ५.३० वाजता सिव्हिल लाईनमध्ये हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या मंगला उईके यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी मंगला यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तन्मय योगी उईके (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दुचाकीचालकाचा शोध घेतला जात आहे.
वाठोड्यात तरुणाचा आकस्मिक मृत्यू
वाठोडा (नंदनवन) मधील संघर्षनगरात राहणारा राजेश लालाजी शाहू (वय २३) याचा शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
वाडीतील इसमाचा मृत्यू
वाडीतील सोनबानगरात राहणारे मनोज भीमरावजी सरोदे (वय ३५) हे शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास मृतावस्थेत आढळले. ममता मनोज सरोदे ( वय २८, रा. मु. पानाखेडा, सारंगी वेकोलि वसाहत, बैतूल) यांच्या सूचनेवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.