अनुष्का खूप स्पेशल आहेस, भावूक विराटने व्यक्त केले प्रेम

Anushka is very special, love expressive emotional love

बंगळुरु –  बंगळुरु येथे विराट कोहलीला गेल्या दोन मोसमातील शानदार कामगिरीसाठी पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली भावूक झाला होता.

२०७-१७ आणि २०१७-१८ मध्ये दमदार शानदार कामगिरीसाठी विराट कोहलीला पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोच रवी शास्त्री यांनी विराटला ट्रॉफ्री देऊन सन्मानित केले. रवी शास्त्री यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना विराट भावूक झाला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला,  माझी बायको प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहे.  त्यामुळे माझ्यासाठी या पुरस्काराची किंमत आणि महत्व आणखीच वाढले आहे. अनुष्का माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. असे म्हणत विराट कोहलीने आपले प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केले. यावेळी प्रेक्षकात बसलेल्या अनुष्काने त्याला चांगलीच दाद दिली.