‘पवारांचे दूत’ राज ठाकरेंच्या भेटीला, आव्हाडांची ‘कृष्णकुंज’वर दोन तास चर्चा

समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड आज ‘कृष्णकुंज’वर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महा नुज्य नेटवर्क मुंबई :-  समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी केलेलं असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड  आज ‘कृष्णकुंज’वर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज टाकरे आणि आव्हाड यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला, तरी ही केवळ सदिच्छा भेट नव्हती, याबद्दल राजकीय वर्तुळात दुमत नाही. (सविस्तर वृत्त लवकरच)