शारीरिक सुखाला नकार दिल्याने पुतण्याने केली चुलतीची हत्या.

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पुतण्याने चुलतीची हत्या केली.दरम्यान, या घटनेनंतर आरोपी शिवाजी गेनू साळवे याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालय उपचार सुरु आहे.

Aunty murder by giving no sex

संगीता देविदास साळवे (वय 50 रा. साकोरी, ता. जुन्नर) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून, त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत होत्या.संगीता देविदास साळवे (वय 50 रा. साकोरी, ता. जुन्नर) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.संगीता साळवे आणि त्यांचे पती आणि मुले संध्याकाळी जेवण करून संगीता घरासमोर अंगणात झोपल्या होत्या तर त्यांचे पती आणि मुले घरामध्ये झोपलेले होते.तर सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी शिवाजी गेनू साळवे त्याठिकाणी आला आणि चुलतीला शारीरिक सुखाची मागणी करू लागला परंतु संगीताने त्याला विरोध केला आणि आरोपी शिवाजीने धारदार शस्त्राने सुनीतावर वर केले.

मंगळवारी (ता. 26) रात्री देविदास, संगीता, मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी यांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर संगीता या घराबाहेरील पडवी मध्ये कॉटवर झोपल्या होत्या. इतर सर्वजण घरामध्ये झोपले होते. बुधवारी पहाटे पावणे पाच वाजता “मला वाचवा, मला वाचवा’’ असा संगीताचा ओरडण्याचा आवाज आला. दरवाजा उघडून देविदास, मुलगा राहुल व मुलगी त्रिवेणी बाहेर आले. आरोपी पुतण्या शिवाजी साळवे याच्या हातात धारदार शस्त्र होते. संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आरोपी शिवाजी साळवेला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास हे साकोरी गावचे पोलीस पाटील आहेत. तर त्यांच्या पत्नी संगीता अंगाववाडी सेविका म्हणून काम करत होत्या. मंगळवारी रात्री संगीता घराबाहेरच्या ओसरीत झोपल्या होत्या. तर देविदास आणि त्यांची मुले घरात झोपले होते. पहाटे अचानक मला वाचवा असा आवाज येऊ लागला. देविदास आणि त्यांच्या मुलांनी बाहेर येऊन पहिले असता संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या जवळ देविदास यांच्या पुतण्या गेनू धारदार शस्त्र घेऊन उभा होता. देविदास यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. पुतण्या गेनू याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी त्याला मी नकार दिला. म्हणून त्याने चिडून माझ्यावर धारदार शास्त्राने वार केले, असे जखमी अवस्थेतील संगीता यांनी सांगितले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशीच ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने संपूर्ण साकोरी गावावर शोककळा पसरली आहे.