भय्यू महाराजांना तोंड बंद ठेवण्यासाठी मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, दिग्विजय सिंह यांचा गंभीर आरोप

Bhaiyu Maharaj had been offered a ministerial post to keep his mouth shut, and Digvijay Singh’s serious charge

भय्यू महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथे राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. ‘कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे’, असे त्यांनी नोटपॅडमध्ये लिहून ठेवले होते. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी यात नमूद केले होते. भय्यू महाराजांच्या आत्महत्येची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात समर्थकांनी बॉम्बे रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासहित अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीचीही मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भय्यू महाराजांच्या आत्महत्येसाठी शिवराज सरकारला जबाबदार ठरवलं आहे. दिग्विजय सिंह बोलले आहेत की, ‘भय्यू महाराज शिवराज सरकारकडून नर्मदामध्ये करण्यात येणाऱ्या बेकायदा उत्खननामुळे चिंतीत होते. तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांना मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी ऑफर नाकारली होती आणि मला फोनवर यासंबंधी सांगितलं होतं’.