बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा

Both of them were sentenced to life imprisonment and punishment for rape

झोपलेल्या महिलेला ठार मारण्याची धमकी देऊन उचलून नेऊन तिच्यावर सामुहीक बलात्कार

महा न्यूज नेटवर्क नांदेड – घरात झोपलेल्या महिलेला ठार मारण्याची धमकी देऊन उचलून नेऊन तिच्यावर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोघांना येथील जिल्हा न्यायाधिश ए. जी. मोबे यांनी जन्मठेप व प्रत्येकी 50 हजाराच्या दंडाची शिक्षा गुरूवारी (ता. 5) ठाेठावली. याच प्रकरणातील दोघांची मात्र पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली.

अर्धापूर तालुक्यातील कामठा (गणपूर) येथील 32 वर्षीय एक महिला नांदेडच्या लक्ष्मीनगर भागात राहत असे. ती आपल्या घरात 25 जानेवारी 2013 मध्ये झोपली होती. यावेळी बळजबरीने तिच्या घरात घुसून ठार मारण्याची धमकी देऊन तिला घरातून उचलून नेऊन तिच्यावर आळीपाळीने चार जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी विमानतळ ठाण्यात बलात्काराचा आरोपी पंकज दाभाडे रा. शिवनगर, शेख रसुल शेख अमीर रा. महेबुबनगर, संजय घोरपडे आणि नितीन पाईकराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस अधिक्षक निर्मलादेवी यांनी तपास करून आरोपींना अटक केली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात 11 साक्षिदारापैकी सहा साक्षिदार फितुर झाल्याने पाच साक्षीदार तपासले. पिडीत महिलेचा जवाब आणि वैद्यकीय अहवाल लक्षात घेता यातील पंकज दाभाडे आणि शेख रसुल शेख अमीर यांना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर संजय घोरपडे व नितीन पाईकराव यांची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षाची बाजू ॲड. संजय लाटकर यांनी मांडली.