गो-तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याने पोलीस अधिकाऱ्याची स्वतःविरोधातच तक्रार

Complaint against the police officer himself

जर एखाद्या गुन्ह्याविरोधात कारवाई केली नाही तर त्या पोलिसाविरोधात कारवाई केली जाईल असा नियम होता

खारखोडा पोलीस स्थानकाचा कार्यभार स्वीकारण्याआधी कोणत्याही प्रकरणात जर अधिकारी दोषी आढळला तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असा नियम मी बनवला होता. जर एखाद्या गुन्ह्याविरोधात कारवाई केली नाही तर त्या पोलिसाविरोधात कारवाई केली जाईल असा नियम होता. एखाद्या परिसरात खून, दरोडा अथवा कोणताही गुन्हा घडल्यास त्या परिसराची जबाबदारी असणाऱ्या पोलीस अधिकार्याला त्या गुन्ह्यासाठी जबाबदार धरलं जाईल, तसंच दोन वेळेस जर अशी चुकी त्या पोलीस अधिकाऱ्याने केली तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असा नियम मी बनवला होता, अशी माहिती राजेंद्र त्यागी यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली. त्यानुसार माझ्या परिसरात गो तस्करीची घटना समोर आली होती, त्यानंतर मी माझ्याविरोधात तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्याने स्वतःविरोधातच तक्रार केल्याचं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःविरोधातच तक्रार दिल्याचा आगळावेगळा प्रकार घडलाय. गो-तस्करी रोखण्यामध्ये अपयशी ठरल्याने येथील खारखोडा पोलीस स्थानकात एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वतःविरोधातच तक्रार केली आहे.

राजेंद्र त्यागी असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते एसएचओ(SHO) म्हणून खारखोडा पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. पोलीस स्थानकातील जनरल डायरीमध्ये त्यांनी ही तक्रार केली आहे.