पिंपळनेरमध्‍ये कंटेनर-ट्रकचा भीषण अपघात, 3 जण गंभीर जखमी

Container-truck accident involving three people seriously injured in Pimpalner

पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटात आज सकाळी 7 वाजता कंटेनर व ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली.

महा न्यूज नेटवर्क पिंपळनेर (धुळे) – पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटात आज सकाळी 7 वाजता कंटेनर व ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले. संजय बारकू पाटील (35) रा. मालेगाव, राम रघुनाथ सहाय्य (36) रा. टोंग (राजस्थान), युवराज दशरथ पाटील (68) रा. धुळे या तिघांच्‍याही पायाला अपघातात गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात त्‍यांच्‍यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍यांना धुळे येथे पाठविण्यात आले.

पिंपळनेरहुन नाशिक कडे जाणारा ट्रक (क्रं. MH 41 G 8286) व नाशिकहुन उदयपूर (राजस्थान) येथे जाणारा कंटेनर (क्रं. MH 04 HD 5873) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दोन्‍ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रकमध्ये वाळू तर कंटेनरमध्ये टायर असल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात झाल्यानंतर काही अंतरावरच आणखी एक ट्रक पलटी होऊन रस्त्याजवळच्‍या शेतात पलटी अवस्थेत दिसून आला. अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान शेलबारी घाटात गेल्या 15 दिवसांत अपघाताची ही 7वी घटना असून या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 2 दिवसंपासून पिंप