अमरावती विभागात पीक कर्जाचे वाटप निराशाजनक : कृषी राज्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

Crop loan allocation in Amravati division disappointing: Minister of State for Agriculture expressed disappointment

ठळक मुद्दे :-

  • जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
  • पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांच्या निराशाजनक कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचा इशारा दिला.
  • या आढावा बैठकीला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अकोला :-खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याच्या कामात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाची कामगिरी निराशाजनक असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार रणधीर सावरकर, आमदार बळीराम सिरस्कार, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, बुलडाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे उपस्थित होते. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाचा जिल्हा व बँकनिहाय आढावा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला. त्यामध्ये खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या, तरी विभागातील पाचही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अद्याप अत्यल्प असून, कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना अत्यंत कमी पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानुषंगाने पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांच्या निराशाजनक कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आठवडाभरात सुधारणा करा; दिरंगाई केल्यास कारवाई!
पीक कर्ज वाटपाच्या कामात आठवडाभरात बँकांनी सुधारणा करावी, अन्यथा संबंधित बँकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, तसेच पीक कर्ज वाटपाच्या कामात कुचराई करणाºया अधिकाºयांवर संबंधित बँक अधिकाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. येत्या दहा दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये रोष; बँकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला!
पीक कर्ज वाटपाची गती बघता, पाचही जिल्ह्यांत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत शंका असल्याच्या परिस्थितीत शेतकºयांमध्ये रोष वाढत असून, ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात बँकांनी आत्मपरीक्षण करून शेतकºयांना जलदगतीने पीक कर्ज वाटप करण्याचा सल्ला कृषी राज्यमंत्र्यांनी बँकांना दिला.