सापाने चावा घेतल्याने सख्ख्या भावा बहिणीचा मृत्यू

Death of a little brother by biting a snake

खाटेवर झोपलेला त्यांचा मुलगा हसीब (१८) आणि मुलगी नाजिया (३) यांचा सापाने चावा घेतला.

महा न्यूज नेटवर्क – उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात सापाने चावा घेतल्याने सख्ख्या भावा बहिणीचा मृत्यू झाला आहे. यासंबंधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीनगर येथील रहिवासी युसूफ कुरेशी यांच्या घरी गुरुवारी रात्री साप शिरला होता. यावेळी खाटेवर झोपलेला त्यांचा मुलगा हसीब (१८) आणि मुलगी नाजिया (३) यांचा सापाने चावा घेतला. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. नजियाचा रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. तर हसीबचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याआधी उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली होती. बलिया येथे सापाने चावा घेतल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. या घटनेसंबंधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याऐवजी घरगुती उपचार करण्यातच वेळ घालवला. नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.