२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आश्वासन देत सुटलो नितीन गडकरींनी केला होता

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आश्वासन देत सुटलो असा गौप्यस्फोट नितीन गडकरींनी केला होता

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आश्वासन देत सुटलो असा गौप्यस्फोट केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत आपण 15 लाखांचा उल्लेख केलाच नव्हता असं सांगितलं आहे. दिल्लीमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने चुकीचं भाषांतर करत चुकीची बातमी झापल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, ‘दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने पूर्ण निराधार वृत्त छापलं. त्यावेळी मी ना मोदींचं, ना भाजपाचं नाव घेतलं, ना मी 15 लाखांचा उल्लेख केला’.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्ती करण्याची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना अशी घोषणा करु नका, आर्थिक दृष्टीने यामध्ये खूप अडचण येईल असं सांगितलं होतं. यावर त्यांनी मस्करीत मला म्हणजे तुम्हाला आपलं राज्य येईल असा विश्वास आहे असं म्हटलं. त्यावर मी आलं तर आपल्याला पूर्ण करावं लागेल असं म्हटलं’.