प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत अन मराठ्यांचा इतिहास वाचावाच – संभाजी भिडे

Every Hindu should read the history of Ramayana, Mahabharata and Maratha – Sambhaji Bhide

अहमदनगर :-आपणाला हिंदू असल्याचा अभिमान असला पाहिजे.  त्यामुळे प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत आणि मराठ्यांचा इतिहास वाचलाच पाहिजे, असे मत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. अहमदनगर टिळक रोड येथील सभेत भिडे बोलत होते.
भिडे म्हणाले, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मनाचे सिंहासन सव्वा वर्षात उभारण्यात येणार आहे. हे सिंहासन उभारून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापण्यात येईल.

‘अहमदनगर’ नव्हे, ‘अंबिकानगर’ म्हणा !
अहमदनगरचा उल्लेख अहमदनगर करु नका. त्याऐवजी अंबिकानगर असे म्हणा, असेही यावेळी भिडे म्हणाले.