पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, लोखंडी पट्‍टी कारच्या आरपार

Fatal accidents on the Pune-Mumbai Expressway, across the iron strip car

 अपघात एवढा भीषण आहे की, लोखंडी पट्टी कारच्या आरपार गेली. अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

महा न्यूज नेटवर्क पुणे- भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्टीला जाऊन धडकली. अपघात एवढा भीषण आहे की, लोखंडी पट्टी कारच्या आरपार गेली. अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सोमाटणे फाटा पुलाजवळ हा अपघात झाला.

अमोल शिवाजी पाटील (वय-39), श्रीमंत कृष्णा भोंदे (वय-45) आणि प्रकाश गोविंद वाईगडे (वय-45, सर्व रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सूर्याजी कृष्णा भोंदे (चालक, वय 39, रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) यांना किरकोळ जखम झाली आहे. हे सर्वजण काही कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरला कारमधून गेले होते. सोमवारी रात्री सर्वजण मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते.

सकाळी सहाच्या सुमारास भरधाव कार साेमाटणे फाट्याजवळ अाली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण पट्टीला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण हाेती की संरक्षक पट्टी कारच्या अारपार गेली. या धडकेमुळे कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला हाेता. या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकजण किरकाेळ जखमी झाला अाहे. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत.