दहावीत पास झालेल्या मुलासाठी मिठाई आणायला गेलेल्या महिलेवर गोळीबार.

A fierce assault on a woman who had gone to make sweets for the 10th son passed.

शीतल सिकंदर या गांधीनगर झोपडपट्टीत राहत असून मुलगा दहावीत पास झाला म्हणून त्या शनिवारी दुपारी एचए कॉलनीतील कॅन्टीनमध्ये मिठाई आणायला गेल्या होत्या.

 

पिंपरीतील एचए कॉलनीत एका महिलेवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. शीतल सिकंदर (३५ वर्षे) असे या महिलेचे नाव असून हल्लेखोरांचा नेम चुकल्याने त्या गोळीबारातून बचावल्या आहेत.

शीतल सिकंदर या गांधीनगर झोपडपट्टीत राहत असून मुलगा दहावीत पास झाला म्हणून त्या शनिवारी दुपारी एचए कॉलनीतील कॅन्टीनमध्ये मिठाई आणायला गेल्या होत्या. शीतल यांच्यासोबत आणखी एक महिला होती. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी शीतल यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र नेम चुकल्याने शीतल थोडक्यात बचावल्या. गोळीबारानंतर शीतल यांनी घटनास्थळाजवळील एका घरात आश्रय घेतल्याने हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.