अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली, पाच जणांचा मृत्यू

Five killed in road accident in Amarnath yatra

जम्मू-काश्मीरच्या गंदरबाल जिल्ह्यातील अमरनाथ यात्रा मार्गावर मंगळवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या गंदरबाल जिल्ह्यातील अमरनाथ यात्रा मार्गावर मंगळवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बालटाल मार्गावर रेलपत्रा आणि बरारीमार्गा दरम्यान ही दरड कोसळली. चार पुरुष आणि एका महिलेसह पाच यात्रेकरुंचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी अमरनाथ यात्रेमधील तीन भाविकांचा मृत्यू झाला. यात दोन भाविक आंध्रप्रदेशचे आहेत. यंदाच्या वर्षी यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.