आजोबांनीच केला १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार

14-month-old grandfather raped by grandfather

नातीवर बलात्कार करून आजोबा फरार झाला आहे, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत अशीही माहिती समोर आली आहे

महा न्यूज नेटवर्क :आजोबा आणि नात यांचे नाते म्हणजे अत्यंत प्रेमाचे, आपुलकीचे आपलेपणाचे असते. मात्र याच नात्याला काळीमा फासणारा प्रकार मध्यप्रदेशात घडला आहे. आजोबांनी आपल्या पुतण्याच्या मुलीवर म्हणजेच अवघ्या १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शनिवारी घडलेली ही धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघडकीस आल्या आहेत. मंदसौर, ग्वालियर या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या, ज्यामुळे देश हादरला. अशात हा आणखी एक प्रकार मध्य प्रदेशातूनच समोर आला आहे.

गजराज सिंग भिल असे नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाचे नाव आहे. भोपाळपासून ५० किमी अंतरावर असलेल्या लातेरी गावात ही घटना घडल्याचे पोलीस उप निरीक्षक बनवारीलाल मालवीय यांनी सांगितले. सुरुवातीला गजराज आपल्या पुतण्याच्या घरी गेला. तिथे त्याची १४ महिन्यांची नात होती. त्याने त्याच्या नातीला खेळवण्याच्या आणि बाहेर फिरवून आणण्याच्या बहाण्याने घरापासून लांब नेले. त्यानंतर अर्ध्या तासाने तो परतला.

यानंतर जेव्हा आईने आपल्या मुलीला जवळ घेतले तेव्हा मुलीच्या अंगावर काही जखमा असल्याचे आणि तिला वेदना होत असल्याचे आईला लक्षात आले. त्यानंतर या १४ महिन्यांच्या मुलीला रूग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट केले जे ऐकून या मुलीच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकारानंतर या मुलीचा आजोबा गजराज फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. POCSO कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.