तो मला वारंवार अंगप्रदर्शन करण्यास सांगायचा – श्री रेड्डी

He wanted to tell me to organize again

अभिनेत्रीने पुन्हा एकदा समोर आणली कलाविश्वाची काळी बाजू

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीरेड्डीने पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अनेकांचच लक्ष वेधलं आहे. एकामोगोमाग एक फेसबुक पोस्ट करत तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांवर निशाणा साधला आहे. मुख्य म्हणजे तिने या मंडळींवर कास्टिंग काऊचचा आरोपही केला आहे. त्याशिवाय प्रोड्यूसर्स काउन्सिलच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अभिनेता विशालवरही तिने आपल्याला धमकावण्याचा आरोप केला आहे.

तामिळ अभिनेता विशाल याच्यापासून आपल्याला धोका असल्याचंही श्रीरेड्डीचं म्हणणं आहे. फक्त विशालच नव्हे तर तिच्या पोस्टमधून काही मोठ्या प्रस्थांचाही उल्लेख करण्यात आला आहे. दिग्दर्शक मुर्गदास यांच्या नावाचा उल्लेख करत श्रीरेड्डीने त्यांना एका प्रसंगाची आठवण करुन दिली आहे. तिची ही पोस्ट पाहता यावर आता मुर्गदासची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्रीरेड्डीच्या पोस्टचीच सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चर्चा रंगू लागली आहे. ज्या माध्यमातून तिने निर्माता- दिग्दर्शक राघव लॉरेन्सवरही काही गंभीर आरोप केले आहेत. एका मित्राच्या ओळखीने मी लॉरेन्स यांना हॉटेलच्या लॉबीत भेटले होते. तेव्हा ते मला एका खोलीत घेऊन गेले. चित्रपटसृष्टीत मी नवोदितांची मदत करतो, असं ते म्हणाले. तेव्हा आपला त्यांच्यावर विश्वास बसल्याचं श्रीरेड्डीने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. पण, हळुहळू त्यांचा खरा चेहरा समोर येण्यास सुरुवात झाली. ते मला वारंवार अंगप्रदर्शन करण्यास सांगायचे, असं तिने म्हटलं आहे.