पुढील ३ दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

Heavy rain forecast across the state for next 3 days; The high alert in Vidharbha

१२ जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस तर उत्तर, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

महा न्यूज नेटवर्क मुंबई: आजपासून पुढील ३ दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस तर उत्तर, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात आणि इतर ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर पूर्व विदर्भातही ९ आणि १० जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण आणि उत्तर कोकणात आजपासून १२ तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तर-मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रात १० जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र काही भागातच मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्व आणि विदर्भात ९ आणि १० जुलैला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात आज जोरदार पाऊस होणार असल्याने अधिक काळजी घेण्याची सूचना हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.