बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्यास तलाक मिळणार !

The Punjab and Haryana High Court has expressed the opinion that divorce can be obtained on the grounds of violation of physical or sexual relations.

 

बळजबरीने शारीरिक संबंध किंवा अनैतिक संबंध ठेवल्यास त्या आधारे तलाक मिळू शकतो, असे मत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

एका महिलेने याचिकेद्वारे तलाक मागितला होता, कनिष्ठ न्यायालयाने सदर महिलेच्या याचिकेवर सुनवणी घेण्यास नकार दिला होता. अखेर चार वर्षांनी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

एका उच्चशिक्षित तरुणीचा विवाह २०१७ मध्ये बिहारच्या तरुणाशी झाला, या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. तिच्या म्हणण्यानुसार, माहेरच्या मंडळींनी पतीच्या घरच्यांना हुंडाही दिला होता. विवाह करताना पती अभियंता असल्याची बतावणी करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर विवाहानंतर पती मारहाण करीत होता आणि अनैसर्गिक संबंध ठेवत होता. तरुणीने केलेले आरोप गंभीर असल्याचे मत न्यायालयाने सुनावणीच्या वेळी मांडले.

बळजबरीने शारीरिक संबंध अथवा अनैसर्गिक संबंधांसाठी पती-पत्नीवर दबाव आणला जातो. त्यामुळे संबंधितांना वेदना होतात. त्यामुळेच पती-पत्नीमधील नाते संपुष्टात येऊ शकते किंवा त्या आधारावर तलाक मिळू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.