पिंपरी-चिंचवडमध्ये पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

In Pimpri-Chinchwad, suicide by taking a husband’s wife

दुपारी घरात कोणी नसताना पती आणि पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली

महा न्यूज नेटवर्क : पिंपरी-चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली येथे पती आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव उत्तम तुकाराम सूर्यवंशी (३५) आणि मुक्ता उत्तम सूर्यवंशी (३१) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी घरात कोणी नसताना पती आणि पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा कृष्णा (१०) आणि मुलगी पूजा (६) हे शाळेत गेले होते. तर मयत मुक्ता यांचा भाऊ हादेखील कामावर गेला होता. याचाच फायदा घेत राहत्या घरात कोणी नसताना सूर्यवंशी दाम्पत्याने एकाच वायरला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

अद्याप या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मयत उत्तम यांनी मेहुण्याला आज दुपारी साडे बाराच्या सुमारास कामावर आहेस का अशी विचारणा केली होती. त्यानंतर साडे तीनच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मयत पती आणि पत्नीला दोन मुलं असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.