इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे बलात्काराचे प्रमाण वाढले: भाजपा खासदार

Internet and smartphone rampant rape: BJP MP

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा नसून शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देऊ शकेल असा नेताच त्यांच्याकडे नाही, असेही त्यांनी सांगितले.

महा न्यूज नेटवर्क- देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट कारणीभूत असल्याचा दावा भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी केला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे तरुणांना सहज अश्लिल व्हिडिओ बघायला मिळतात आणि याचा प्रभाव त्यांच्या मनावर पडतो, असे त्यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशमधील मंदसौर येथे ७ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, यावर तुमचे मत काय, असा प्रश्न बुरहानपूरचे खासदार नंदकुमार चौहान यांना पत्रकारांनी विचारला. यावर चौहान म्हणाले, यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट कारणीभूत आहे. यामुळे तरुणांना सहज अश्लिल व्हिडिओ बघणे शक्य झाले आहे. याचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. इंटरनेटमुळे लोकांमध्ये मानसिक विकृती येत असून यातूनच बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, असा दावा त्यांनी केला.