महापालिकेचे अठरा विद्यार्थी होणार लखपती

Lakhpatpur will be the student of eighteen students of the municipal corporation

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. यावर्षीच्या निकालानुसार अठरा विद्यार्थीं लखपतीच्या बक्षीसास पात्र ठरले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अठरा शाळा आहेत. यापैकी पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील सहा, पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयातील पाच, भोसरी आणि निगडी माध्यमिक विद्यालयातील दोन, चिंचवड, आकुर्डी आणि काळभोरनगर या माध्यमिक विद्यालयांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने ९० टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्यांमध्ये पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील सात, कासारवाडीत चार, निगडीत दोन, पिंपरीनगर, पिंपळे गुरव, लांडेवाडी, नेहरुनगर आणि संत तुकारामनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, पिंपळे सौदागर, केशवनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी सहा, कासारवाडी, क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील प्रत्येकी चार, रुपीनगर तीन, निगडी दोन, काळभोरनगर, भोसरी आणि संत तुकारामनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांला ८० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

गुणवंतांसाठी
बक्षीस योजना
महापालिकेतर्फे ८० टक्क्यांहून अधिक गुण घेणाºया विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला जातो. ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला एक लाख, ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्यास पन्नास हजार रुपये आणि ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.