विधानपरिषद पोटनिवडणूक : पराभवाची जबाबदारी स्वीकारतो – धनंजय मुंडे

Legislative council sends responsibility for defeat – Dhananjay Munde

बीड : बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून, भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.

दरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पराभव पत्करावा लागला असून, संख्या बळ कमी असताना ही निवडणूक भाजपचे सुरेश धस 78 अधिकची मतं घेऊन विजयी झालेत. दरम्यान या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारतो, कुठे चूक झाली त्याचं आत्मपरीक्षण करू, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीच्या निकालानंतर दिली.