संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ होता : संभाजी भिडे

Manu was better than Saint Tukaram and Saint Dnyaneshwar Maharaj

आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

काल (शनिवारी) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या आणि वारकरी भाविकांचं पुणेकरांनी स्वागत केलं. तर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सालाबादप्रमाणे संचेती हॉस्पिटल पूल ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत स्वयंसेवकासह सहभागी झाले. त्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना भिडे यांनी, आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त विधान केले.

यावेळी बोलताना, ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे.त्या सर्वांनी गावागावात सभा संमेलन घ्यावे. देशाला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे.  ‘वैदिक हिंदू धर्म हा अनुभव सिद्ध असून मनाला जिंकून घेण्याची प्रक्रिया म्हणजे धर्माचार होय. धर्म हा आचरणातून बळकट होतो. त्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनांची गरज असून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यायला हवे,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे गुरुजी यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन केले. त्यानंतर जंगली महाराज मंदिरापासून संचेती हॉस्पिटल जवळील पुलापर्यंत हजारो धारकऱ्यांसह ते पायी चालत आले. या दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यामागे मागील वर्षी शिव प्रतिष्ठान कार्यकर्ते पालखीमध्ये सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बंदोबसत ठेवण्यात आला होता.