मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बंद होणार ?

Mobile number portability will be discontinued?

ट्राय (TRAI)चा कारभार हा मनमानी आणि पारदर्शक न ठेवता मोबाईल नंबर पोर्टबिलिटी चार्ज घटवण्यात आले. या प्रकरणी कोर्टामध्ये दाद मागण्यात आली आहे.

न परवडणारे रिचार्ड, रेंज न मिळणे किंवा इतर अनेक कारणांमुळे सध्या मोबाईल नंबर पोर्टीबिलिटीचे प्रमाण वाढले आहे. एखादी कंपनी आपल्याला हवी ती सेवा योग्य त्या किंमतीत देत नसेल तर मोबाईल नंबर पोर्ट करण्याला प्राधान्य दिले जात आहे. आहे तोच नंबर ठेऊन दुसऱ्या टेलिकॉम कंपनीची सेवा घेणे शक्य असल्याने हे काम ग्राहकांसाठी आणखीनच सोयीचे झाले आहे. मागच्या काही वर्षात या सेवेचा असंख्य लोकांनी फायदाही घेतला. मात्र आता २०१९मध्ये ही सेवा बंद होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याच नंबरवर वेगळ्या कंपनीची सुविधा घेता येणार नाही.

मोबाईल नंबर पोर्टबिलिटीसाठी काम करणारी एमएनपी इंटरकनेक्शन टेलीकॉम सॉल्यूशन्स आणि सिनिवर्स टेक्नोलॉजी कंपनी तोट्यात आहे. जानेवारी महिन्यापासून पोर्टिंग फीमध्येही ८० टक्के कपात केल्याने त्यांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे मार्च २०१९ पासून कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र टेलिकॉम कंपन्यांची लायसन्स रिन्यू होणार नसल्याने कंपन्यांना इतर पर्याय शोधावे लागणार आहेत. पोर्टबिलिटीची सुविधा बंद पडल्याने ग्राहकांनाच त्याचे नुकसान होणार आहे.

मे महिन्यापासून पोर्टेबिलिटीसाठी सुमारे २ कोटी अ‍ॅप्लिकेशन्स प्रोसेसमध्ये आहेत. त्याचे नेमके काय होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सर्व्हिस देणार्‍या कंपन्यांच्या मते, ट्राय (TRAI)चा कारभार हा मनमानी आणि पारदर्शक न ठेवता मोबाईल नंबर पोर्टबिलिटी चार्ज घटवण्यात आले. या प्रकरणी कोर्टामध्ये दाद मागण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी ४ जुलैला होणार आहेत. मात्र या प्रकरणात पर्याय न निघाल्यास पोर्टबिलिटीची सुविधा बंद पडू शकते. जानेवारी २०१८ मध्ये TRAI ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा दर १९ रूपयांवरून ४ रूपये इतका कमी केला होता. त्यामुळे मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी देणार्‍या कंपन्यांना नुकसान झाले. २०१७मध्ये जिओने बाजारात प्रवेश केल्यानंतर पोर्टेबिलिटीसाठीच्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच इतर कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरु झाली.