अमेरिके गुप्तचर संस्थेने विहिप आणि बजरंग दलाला ठरवले दहशतवादी

cia announces vhp and bajrang dal as religious militant organisations

टीम महा नुज्य :- अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलला ‘धार्मिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. तर आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना म्हंटल आहे.

सीआयएकडून दरवर्षी ‘द वर्ल्ड फॅक्टबुक’नावाने अहवाल जाहीर केला जातो. यामध्ये जगभरातील जगातील 267 देशांची माहिती देण्यात आलेली आहे. या अहवालात विविध देशांच्या राजकीय, सामाजिक, उद्योग तसेच इतर विषयांची माहिती देण्यात येते.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले असून दहशतवादी म्हणून केलेला उल्लेख काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सीआयएला दिला आहे.

दरम्यान, आम्ही राष्ट्रवादी असून आम्ही देशाच्या हितासाठी काम करतो. सीआयएनमे ओसामा बिन लादेनची निर्मिती केली त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याच विहिंपने म्हटले आहे.