खासदार उदयनराजेंच प्रेम अनेक वेळा उतू जाते- आ. शिवेंद्रराजे भोसले

MP Udayan Raje Love is overwhelmingly many times- come. Shivendra Raje Bhosale

सातारा :- खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होत असतात. उदयनराजेंच्या ओठात एक अन् पोटात दुसरेच असते. अश्या शब्दात शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रराजे बोलत होते. सातारा नगरपालिकेत झालेल्या चुकीच्या कामांची तक्रार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली.

खा. उदयनराजे मला रयत शिक्षण संस्थेमध्ये घ्यावे असे म्हणतात पण त्यांच्या ओठात एक अन् पोटात दुसरेच असते. त्यांच्या प्रेमाची अनेक रूपे सातारकरांनी पाहिली आहेत. त्यांचे प्रेम अनेक वेळा उतू पण जाते. रयत संस्थेवर पवारसाहेब असल्याने त्या ठिकाणी माझी आवश्यकता नाही, अशे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

तसेच शरद पवार राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते कोणताही चुकीचा निर्णय घेणार नसल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.