राम मंदिरासाठी मुस्लिमांनी सहकार्य न केल्यास – गिरीराज सिंह

भाजपा खासदार गिरीराज सिंह यांनी राम मंदिरासाठी मुस्लिमांनी सहकार्य करावं, अन्यथा काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे

एकीकडे राम मंदिरावरुन भाजपावर वारंवार विरोधकांकडून टीका होता होत असताना दुसरीकडे नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं त्यात भर टाकत आहेत. भाजपा खासदार गिरीराज सिंह यांनी राम मंदिरासाठी मुस्लिमांनी सहकार्य करावं, अन्यथा काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवादाचे खासदार गिरीराज सिंह बिहारमधील बरबीघा येथे पोहोचले असता कार्यकर्त्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी बोलताना केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री गिरिराज सिंह यांनी हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांनी राम मंदिर उभं करण्यासाठी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. जर राम मंदिर झालं नाही तर हिंदूंची मनं दुखावतील. यानंतर काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांना बाहेर काढलं जात असल्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर टीका केली. हे काँग्रेसमुळे होत असल्याचं ते म्हणाले आहेत.

गिरीराज सिंह याआधीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. याआधी लोकसंख्येवर बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘2047 मध्ये पुन्हा एकदा देशाची फाळणी होईल’, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. सध्या 35अ वरुन वाद सुरु आहेस, मात्र आगामी काळात भारताचा उल्लेख करणंही कठीण होईल असंही ते म्हणाले होते. काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.