आसाम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये पावसाचे थैमान, अनेक भागात पूरस्थिती

national/rainfall-assam-tripura-and-manipur-flooding-many-areas/?utm_source=Recommendation-Desktop

गुवाहाटी : देशाभरातील काही भागात मान्सूनची हजेरी लागली नाही. मात्र, उत्तर पूर्व भागातील आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे येथील नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचले आहे.

आसाममधील लमडिंग-बादरपुर हिल स्टेशन परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने याठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे येथील 4 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यासह येथील लोकल सेवेवर सुद्धा परिणाम झाला असून रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे.

त्रिपुरामध्ये पावसामुळे आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले. हजारो लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे भाग पडले आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे. तसेच, बिप्लब कुमार देब यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली असून लष्कराची आणि राज्यात एनडीआरएफची टीम पाठविण्याची मागणी केली आहे