आता हे करून दाखवा; पंतप्रधान मोदींचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

Now do this; Challenge of Prime Minister Modi’s Karnataka Chief Minister

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले फिटनेस चॅलेंज आज त्यांनी पूर्ण केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराटला ‘फिटनेस चॅलेंज’ दिले होते. ते स्वीकारताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिले होते. पंतप्रधानांनी आज योगा करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत चॅलेंज पूर्ण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्त केलेल्या व्हिडियोमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची योगासने करताना दिसत आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या विशेष ट्रॅकवर मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटत असल्याच ट्विट त्यांनी केले आहे.