पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

Pankaja Mundane Push; Millennium scams?

 जिल्ह्यात आणि तालुक्यात जलयुक्तच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्याचं कळतय.

महा न्यूज नेटवर्क बीड | ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या असून मुंडें यांच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात जलयुक्तच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्याचं कळतय.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार पुण्यातील कृषी आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर शहानिशा केली असता यामध्ये घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलं.

दरम्यान, याप्रकरानंतर तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.