पेण – खेमवाडी एसटी बसला अपघात; ३२ प्रवासी जखमी

Pen-Khemwadi ST bus accident; 32 passengers injured

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली

महा न्यूज नेटवर्क : पेन  – खेमवाडी एस .टी. बस ला वरवणे गावा नजीक चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात होऊन ३२ प्रवासी जखमी होण्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील ९ गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी एम.जी.एम. हॉस्पिटल पनवेल येथे तर एका जखमीला जिल्हा रुग्णालय येथे व इतर जखमींवर पेण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पेण तालुक्यातील दुर्गम अशा खेमवाडी येथून पेण कडे येणारी बस (एमएच-२०-७३९८) पेण पासून १५ किमी अंतरावरील वरवणे येथील अवघड वळणावर आली असता बस चालकाचा बस वरील ताबा सुटून बस शेतात घुसून झालेल्या अपघातात ३२ प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघातातील गंभीर जखमी असलेले बसचा चालक आकाश गायकवाड, महिला वाहक किष्किंदा आंधळे, प्रवासी दर्शना कांबळे, अशोक जाधव, काशिनाथ आधार, भाऊ आखाडे, निलेश शिंगवन, वामन बांगर, गुलाब पवार, नितु ठाकूर, मोहिनी वाघ, काशीबाई, अशोक दोरे या गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी पनवेल येथील एम. जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर श्वेता मांढरे या पेण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर किरकोळ जखमींना पेण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच पेण चे आमदार धैर्यशील पाटील, तहसीलदार अजय पाटणे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.