आता हवेतही प्लॅस्टिक बंदी!

Plastic ban in the air!

प्लॅस्टिक बंदीचा पर्यावरणपुरक निर्णय हिंदुस्थानच्या विमान कंपन्यांनी उचलून धरला आहे.

महा न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागानं घालून दिलेला आदर्श आणि प्लॅस्टिक बंदीचा पर्यावरणपुरक निर्णय हिंदुस्थानच्या विमान कंपन्यांनी उचलून धरला आहे. प्लॅस्टिकचा उपयोग कसा कमी करता येईल यावर हिंदुस्थानच्या एअर लाईन कंपन्यांचा भर आहेत. यावर ते नवनवीन उपाय शोधत आहेत.

बायोडिग्रेडेबल कटलरी, पेपरचे कप आणि स्ट्रॉ असे हरित पर्याय त्यांनी प्रत्यक्ष वापरात आणण्यास सुरुवात केली आहे. एआयटीएच्या सर्वेक्षणानुसार २०१६ मध्ये ५.२ मिलियन टन कचरा फक्त एअरलाईन कंपन्यांमधून निघत होता. जो मुंबईच्या दोन वर्षात जमा होणाऱ्या कचऱ्या इतका आहे. हाच कचरा कमी करण्यासाठी अनेक एअर लाईन कंपन्यापुढे आल्या आहेत.

विस्टाराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पर्यावरणाचं संरक्षण करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी विमान कंपन्यांनी हरित पर्यायाची निवड केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही गो ग्रिनची शपथ घेतली आहे. त्यानुसार, प्लॅस्टिकच्या भांड्यांऐवजी एल्युमिनियमची भांडी वारपण्यास सुरुवात केली आहे. बायोडिग्रेडेबल प्लेट, पेपर स्ट्रॉ, लाकडी चमचे असे विविध उपायाचा वापर यापुढे करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

तर, जेट एअरवेजने यावर उपाय म्हणून पेपर कप, लवकर विघटन होणाऱ्या पिशव्या व डब्बे यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गो एअरने सुद्धा इतर एअर लाईन कंपन्यांच्या प्रमाणे प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने सुद्धा या निर्णयाला पाठिंबा देत चीनी मातीच्या कपचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.