पॉर्नच्या घातक नशेनं नात्याचा विसर… मुलाचा मोठ्या बहिणीवरच बलात्कार

Porn’s fatal drunkenness is forgotten … Rape on the child’s big sister

नवी मुंबई – बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पॉर्न फिल्मचं व्यसन लागलेल्या एका तरुणानं स्वतःच्या मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही हादरवणारी घटना नवी मुंबईतील कामोठे येथे घडली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी अल्पवयीन असून त्याचे वय केवळ 14 वर्षे इतकेच आहे.

कामोठे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पर्शुराम भातुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पॉर्न फिल्म व व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लागले होते. पॉर्न पाहण्याच्या आहारी  गेलेल्या आरोपीनं स्वतःहून दोन वर्षांनी मोठ्या बहिणीवर बलात्कार केला. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर मुलीला डॉक्टरकडे नेण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

2 महिन्यांनंतर घटना उघडकीस 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ-बहीण घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. तर, पालक तळमजल्यावर राहायचे. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीनंतर पालकांनी मुलीला डॉक्टरकडे नेले. यादरम्यान वैद्यकीय तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. यावेळी पालकांना मोठा धक्का बसला. यानंतर मागील दोन महिन्यांपासून आपला भाऊ लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.