आधी एल्फिन्स्टन..आता अंधेरीतील गोखले ब्रिज; मुंबईत या स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी

Previously Elphinstone .. Now the dark Gokhale bridge; These stations can also be stamped in Mumbai

गेल्यावर्षी 23 सप्टेंबरला परळ आणि एलफिन्स्टन रोड स्टेशनला जोडणार्‍या पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी झाली होती.

महा न्यूज नेटवर्क मुंबई – अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा गोखले पूलाचा काही भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. या दुर्घटनेत दोन पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्यावर्षी 23 सप्टेंबरला परळ आणि एलफिन्स्टन रोड स्टेशनला जोडणार्‍या पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी झाली होती. पूल पडल्याच्या अफवा पसरुन 23 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत कोणी आपला भाऊ गमावला, तर कोणी आपली आई गमावली होती. या दुर्घटनेला जबाबदार कोण? कोणी पसरवली अफवा? ही प्रश्ने अजूनही अनुत्तरीच आहेत.

पाऊस जबाबदार..रेल्वे अधिकार्‍यांना क्लिन-चिट!
पश्चिम रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेचे सर्व खापर पावसावर फोडले आहे. पाऊस आणि अफवेमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे चौकशी समितीने दिलेल्या अहवालात म्‍हटले आहे. विशेष म्हणजे रेल्वे अधिकार्‍यांना क्लिन-चिट देण्यात आली आहे. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरक्षा ऑडित देण्यात आले. परंतु एक महिना उलटूनही मुंबईतील बहुतांश स्थानकांची स्थिती जैसे थेच आहे.

या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असलेल्या मुंबईतील काही स्थानकांची माहिती घेऊन आलो आहे. रेल्वे प्रशासनाने ऑडिट घेऊन रिपोर्टही सादर केला आहे. परंतु त्यावर अंमलबजावनी कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.