राजकीय मस्ती चढलेल्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याकडून राहुल माळी चा अंत.

राहुल माळी  राजकीय मस्तीचा बळी

महा न्यूज नेटवर्क -बीड – वडवणी – बुधवार दिनांक 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन पण या दिवसी वडवणी येथील एका युवा तरुणाचा जीवन कायमच संपवण्याच काम सत्ताधाऱ्यांच्या कृपेने मुख्य पदाचा लाभ मिळाल्यामुळे आलेल्या राजकीय मस्तीने केले आहे.

वडवणी येथील प्रतिदिन व्यवसायईक हनुमंत माळी ( ओतारी ) यांची जमीन व वीटभट्टी जवळच्या मैंदा शिवारात आहे. वडवणीच्या बाजार दिवस असल्याने माळी कुटुंबाने शेतातील म्हशीनां चारा-पाणी करून येण्यासाठी आपला मुलगा राहुल माळी ( ओतारी ) यास दुचाकीवर पाठवले शेतातील काम आटोपून तो वडवणीकडे परत येत असताना

दुपारी 02.10 वाजता कानिफनाथ टेकडी जवळ वळणावर बीड कडून येणाऱ्या सुसाट FORD ENDEAVOUR 3.2L TITANIUM 4 या MH44 S 2121 या चार चाकी गाडीने वळण न घेता समोर एका बाजूने दुचाकीवरून जाणार्या राहुल माळी यास जोराची धडक देत शंभर फुटापर्यंत खरडत नेले .दृश्य पाहून आजूबाजूचे तसेच घाटसावली येथील लोकांना हि गाडी ने उडवता-उडवता वाचलेले लोकत्या चार चाकी गाडीचा पाटलाग करत आले होते.त्यांनी गाडी चालवणाऱ्यांच्या एका समितीच्या प्रमुख बाल हक्क संरक्षण आयोग डॉ.शालिनी कराड यांना जाब विचारला असता कोणालातरी फोन वर बोलत धावून आलेल्या लोकांना माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशी भाषा वापरली , म्हणत एका रिक्षातून वडवणीला पळ काढला.

येवढी मस्ती असणाऱ्यांना सत्तेतील अधिकार पदे उपभोगांचा अधिकार नाही.गाडीचा काहीही तांत्रिक दोस नसतांना बेताल पणे गाडी चालवणारे डॉ.शालिनी कराड यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून एका संसार उध्वस्त झालेल्या कुटुंबास पोलीस अधीक्षक साहेब , मुख्यमंत्री साहेब ,पालकमंत्री साहेब यांनी न्याय देवा.अशी मागणी सर्व वडवणी करांनी केली आहे.गुन्हेगारास पाठीसी घातल्यास वडवणी करांना संताप्त प्रतिक्रिया प्रदर्शित करण्याची वेळ आणू नये.