नवी युती: राणेंच्या स्वाभिमानीला मनसेच्या इंजिनाची साथ

जनतेला आता आणखी एक नवी युती पहायला मिळणार

महा नुज्य नेटवर्क मुंबई:- राज्यातील जनतेला आता आणखी एक नवी युती पहायला मिळणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची युती झाली आहे. राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत उमेदवार राजू बंडकर याना मनसेनं पाठिंबा दिलाय. राजू बंडगर यांनी राज ठाकरेंची भेट मंगळवारी घेतली. या भेटीनंत मनसेनं बंडगरांना पाठींबा दिल्याचं जाहीर केल्याची माहिती मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी दिली. या संदर्भात मनसेचं कार्यालय राजगड इंथं आज (बुधवार, २० जून) विभागअध्यक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत बंडगर यांना निवडणुकीत सहकार्य करण्याबाबत सूचना करण्यात येतील अशी माहिती नांदगावकरांनी दिली..