उसामध्ये कुत्रीवर केला बलात्कार, FIR दाखल

Rape of dogs in sugarcane

महिलाच नाही तर जनावरेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे.

लखनऊ – उत्तरप्रदेशमध्ये महिलाच नाही तर जनावरेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले आहे. बागपत जिल्ह्यातील सिंघावली अहीर पोलिस स्टेशनमधील एक घृणास्पद घटना समोर आली आहे. ती वाचून तूम्हाला धक्का बसेल. पोलिसांनी एका तरुणाविरोधात कुत्रीवर बलात्कार केला म्हणून केस दाखल केली आहे. पोलिस पीडित कुत्रीचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेश कुमार श्रीवास्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरचिटा गावातील कल्लू जानू यांनी केलेल्या तक्रारीनंतर गावातील बबलू सिंह याच्यावर भा.द.वी 377, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना तीन जुलै रोजी घडली तर सहा जुलै रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्लू आपल्या उसाच्या शेतात काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आरोपी बबलू सिंह कुत्रीबरोबर शारीरिक संबंध करत असल्याचे त्याने पाहिले. त्यावेळी कल्लूने याचे मोबाईलमध्ये फोटो घेतले आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली. त्यानंतर नाराज झालेल्या आरोपी बबलू सिंग आणि कुटुंबियांनी कल्लूला मारहाण केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर पुढील तपास सुरु असल्याचेही राजेश कुमार यांनी सांगितले. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. पोलिस कुत्रीचा शोध घेत आहेत.

आशीच प्रकारची घृणास्पद घटना गुजरातमधील वडोदरामध्येही घडली होती. एका टोळक्याने गाईंसोबत अमानवीय कृत्य करत त्यांच्यावर बलात्कार केला होता.