भररस्त्यात लैंगिक चाळे ; ‘महिला’ पोलिसांच्या ताब्यात .

Mumbai – A pair of sexually transmitted video on Nariman Point has been viral. The pedestrians have painted this type of time yesterday. The police took the woman immediately after the wound and took the woman.

 

मुंबई – नरिमन पॉईंट येथील गजबजलेल्या रस्त्याच्या दुभाजकावर लैंगिक करणाऱ्या एका जोडप्याची चित्रफीत वायरल झाली आहे. पादचाऱ्यांनी काल घडलेला हा प्रकार चित्रित केला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घाव घेऊन महिलेला ताब्यात घेतले. तर या घटनेतील रशियन नागरिकाने पळ काढला होता. महिलेची मानसिक स्थिती चांगली नाही. ती पत्ता आणि कुटुंबीयांबाबतची माहितीही सांगत नाही, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
 

नरिमन पॉईंट येथील रस्त्यातील आक्षेपार्ह प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी पोलिसांना पाहून दोघांनीही रस्ता ओलांडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, या घटनेतील 30 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने गोव्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला असता तिने तो पत्ता नाकारला. तसेच तिने कपडे घालण्यास नकार दिला. तिला चेंबूर येथील रिमांड होमला पाठवण्यात आले आहे. ही महिलाही काही काळ परदेशात वास्तव्यास होती. तर इगोर इलेक्‍सी तुर्रक्‍सी (35) या रशियन नागरिकाला आज अटक केली.