प्रेयसीशी लग्न झाल्या नंतर , मधुचंद्राच्या रात्री समजले ती ‘तो’ आहे

She got married to a prince, and at midnight she realized that she is ‘he’

वैद्यकीय कारणांमुळे मुलगी आई होऊ शकणार नाही हेदेखील तरूणीच्या घरातल्यांनी स्पष्ट केले होते

महा न्यूज नेटवर्क : महाविद्यालयातली मैत्री, त्यानंतर एकमेकांवर जडलेले प्रेम, सोबत राहण्यासाठी घेतलेल्या आणाभाका.. आणि मग लग्न. हे सगळे झाल्यावर मधुचंद्राच्या रात्री प्रियकराला समजले की आपण जिला आपले मानून लग्न केले ती ती नाहीच तर ‘तो’ आहे. मुंबईतील गोवंडी येथील २१ वर्षीय तरूणासोबत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एका कार्यक्रमात या तरूणाची १९ वर्षांच्या तरूणीशी ओळख झाली. तरूणीच्या घरातल्यांना जेव्हा या दोघांबद्दल कळले तेव्हा त्यांनी मुलाच्या मागे लग्नासाठी तगादा लावला.

वैद्यकीय कारणांमुळे मुलगी आई होऊ शकणार नाही हेदेखील स्पष्ट केले. तरूणाच्या घरातल्यांनी या लग्नाला विरोध केला होता. मात्र तोही नंतर मावळला. या दोघांचे लग्न झाले. त्यानंतर हे नवविवाहित जोडपे मधुचंद्रासाठी कुलू मनाली येथे गेले. तिथे गेल्यावर तरूणीने आपल्याला हर्नियाचा त्रास होतो आहे, पाठीच्या मणक्यात पाणी झाले आहे असे सांगत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र सगळी कारणे अपयशी ठरल्यावर या तरूणीने अखेर आपण तो असल्याचे मान्य केले. एवढेच नाही तर व्हर्जिनोप्लास्टी झाल्याचेही कबूल केले. हा सगळा प्रकार ऐकून तरूणाच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र तरूणीने तू याबाबत काहीही वाच्यता केली तर आत्महत्या करू अशी धमकी दिली. त्यामुळे हा तरूण चांगलाच घाबरला.

मानसिक तणावात या तरूणाने काही दिवस काढले. मात्र एके दिवशी त्याच्या भावनांचा बांध फुटला आणि त्याने आपल्या घरातल्यांना नेमके काय घडले आहे याची कल्पना दिली. त्यांनी तरूणीच्या घरातल्यांना जाब विचारला. मात्र त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देत नंतर थेट घटस्फोटाचा आग्रह धरला. त्यासाठी भाडोत्री गुंडांचाही वापर करून तरूणाला धमकावले. फसवणूक झाल्याने या तरूणाने आणि त्याच्या घरातल्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

कब्रस्तान हॉलमध्ये लग्न
जानेवारी महिन्यात लग्नाची तारीख काढण्यात आली तेव्हा सीएसटी येथील न्यू हज कमिटी येथे हॉल बुक करण्यात आला होता. मात्र लग्नाला १५ दिवस उरलेले असताना तिथे लग्न होत नसल्याचे कळवले आणि तरूणीच्या वडिलांनी माहिम येथील कब्रस्तान हॉलमध्ये या दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता. ही बाबही मुलाच्या घरातल्यांन खटकली होती. मात्र आपल्या प्रेमापोटी ते गप्प बसले असे मुलाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी दिली.