…म्हणून पुढील ४८ तास मुंबईसह राज्यभरात कोसळधार सुरु राहणार!

So, in the next 48 hours, Mumbai will continue to lag behind!

मुंबईसहीत राज्यभरातील पाऊस बुधवारपर्यंत असाच पडत राहण्याची शक्यता

महा न्यूज नेटवर्क :- मुंबईमध्ये शनिवारपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही पहायला मिळत आहे. शनिवारी १३१ मीलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर मागील चोवीस तासांमध्ये (रविवारी सकाळी ८:३० ते सोमवार सकाळी ८:३० वाजेपर्यंत) मुंबईत १२२ मीलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिमेकडे गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या हवेच्या दाबामुळे महाराष्ट्रात पुढील २४ ते ४८ तासांमध्ये मुंबईपासून विदर्भापर्यंत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.

मुंबईसहीत महाराष्ट्राचे हवामान सध्या दोन्ही मुख्य किनारपट्ट्यांवरील हवामानाच्या प्रभावाखाली आहे. पहिले म्हणजे, पश्चिम  किनारपट्टीवर दक्षिण गुजरात पासून कोकण क्षेत्रामध्ये असणारे हवामान सक्रिय आहे. आणि दुसरे म्हणजे, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती. बंगालच्या उपसागरावरील हवामानामुळे आता दक्षिण छत्तीसगड, पूर्व मध्यप्रदेश आणि विदर्भामध्ये पाऊस सुरु आहे. दोन्ही प्रणालींच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातील कनवर्गन्स झोन (अभिसरण प्रदेश म्हणजेच पाऊस पडण्याची शक्यता असणारा प्रदेश) तयार झाला आहे.

मुंबईसहीत महाराष्ट्राचे हवामान सध्या दोन्ही मुख्य किनारपट्ट्यांवरील हवामानाच्या प्रभावाखाली आहे.

या हवामानच्या स्थितीमुळे राज्यभर पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर दिसून येत आहे. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाचे ढग असल्याचे सॅटलाइट इमेजेसवरून दिसत आहे. यामुळेच मुंबईत शनिवारपासून तर राज्यभरात कालपासून पाऊस पडत आहे. ही स्थिती पुढील २४ ते ४८ तास अशीच राहण्याची शक्यता असल्याने मुंबईसहीत राज्यभरातील पाऊस बुधवारपर्यंत असाच पडत राहण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.