नववीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला , शरीरावर जखमा.

गुजरात वडोदरा येथील शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे

The body of Ninth student was found in the school’s sanitary latrine

गुजरात वडोदरा येथील शाळेच्या स्वच्छतागृहात शुक्रवारी सकाळी एक विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. नवव्या इयत्तेत शिकणारा हा विद्यार्थी १४ वर्षांचा असून त्याच्या शरीरावर चाकूने भोसकल्याच्या खूणा आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या घटनेने मागच्यावर्षी देशभरात गाजलेल्या प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दिल्ली गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळला होता. गळा कापून प्रद्युम्नची हत्या करण्यात आली होती.

या हत्येने पालकवर्गाला जबर धक्का बसला होता तसेच देशभरात संतापाची लाट उसळली होती. शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यावेळी तपासातून समोर आले होते.