मुंबईत-सेक्स करताना इस्त्रायल गर्लफ्रेंडचा मृत्यू.

मुंबईत सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी बॉयफ्रेंडवर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. हे दोघेही इस्त्रायली नागरिक आहेत. ते मुंबईत आले होते. पोलिसांनी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात येणार आहे. ओरिरन याकोव असे या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या वर्षी आपल्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे वास्तव्यास होते. टुरिस्ट व्हिसावर ते दोघेही मुंबईत आले होते. हे दोघे हॉटेलमध्ये सेक्स करत असताना त्याच्या गर्लफ्रेंडचा गुदमरून मृत्यू झाला. 

The death of Israeli girlfriends during sex.

त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. ही हत्या आहे का? असा संशय पोलिसांना आधी होता. याप्रकरणी फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालानुसार २० वर्षीय मुलीचा मृत्यू सेक्स दरम्यान गुदमरूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ओरिरन याकोवने सेक्स दरम्यान आपल्या गर्लफ्रेंडचा गळा दाबला होता त्यामुळे गुदमरून तिचा मृ्त्यू झाला, हेदेखील अहवालात म्हटले गेले आहे.

त्याचमुळे पोलिसांनी या मुलीच्या बॉयफ्रेंडला म्हणजेच ओरिरन याकोविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते तातडीने हॉटेल रूममध्ये गेले होते. तिथे त्यांना ओरिरन याकोवची गर्लफ्रेंड निपचित पडलेली आढळून आली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

त्यानंतर या मुलीचा मृतदेह इस्त्रायलला नेण्यात आला. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी ओरिरन याकोव गुन्हा नोंदवला आणि त्याला आता अटक केली जाणार आहे.