प्राचार्याला ब्लॅकमेल करुन ९ लाख रुपये उकळणाऱ्या तरुणीला अटक.

The girl, who was boiling a 9 lakh rupees by blackmailing the teacher, was arrested.

सुनीता त्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी आहे. मला नोकरीची आवश्यकचा असून मला मदत करा, असे सांगत तिने प्राचार्यांना स्वतःच्या घरी बोलावले.

 

तळेगाव दाभाडे महाविद्यालयातील प्राचार्याला ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळणाऱ्या तरुणीला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. प्राचार्यासोबत अर्धनग्न अवस्थेत फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होते. सुनीता करवंदे (वय ३२) आणि स्वप्नील घाग (वय ४८) अशी आरोपींची नावे आहेत.

सुनीता करवंदेने १ जून रोजी ६५ वर्षांच्या प्राचार्यांना फोन केला. सुनीता त्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी आहे. मला नोकरीची आवश्यकचा असून मला मदत करा, असे सांगत तिने प्राचार्यांना स्वतःच्या घरी बोलावले. प्राचार्य घरी येताच सुनीताने तिचा साथीदार स्वप्नीलच्या मदतीने प्राचार्यांना घरात कोंडले. त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले आणि अशा अवस्थेत सुनीताने त्यांच्यासोबत फोटो काढले.

अर्धनग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सुनीता व तिच्या साथीदाराने प्राचार्यांकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. प्राचार्यांनी यातील नऊ लाख रुपये दिले. मात्र, यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली.