फेसबुकवर बॉयफ्रेंडसमोरच तरुणीची लाईव्ह आत्महत्या

The girl’s suicide in front of boyfriend on Facebook

पश्चिम बंगालमधील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरुणी फेसबुकवर लाईव्ह चॅट करत होती. लाईव्ह चॅट सुरु असतानाच तरुणीने गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं. ही सर्व घटना फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय तरुणी सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरातील रहिवासी आहे. तरुणीने फेसबुवक लाईव्हदरम्यानच आत्महत्या केली असून यावेळी ती एका व्यक्तीसोबत चॅट करत होती. चॅट करणारी व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती मिळत आहे.

शनिवारी आपल्या बॉयफ्रेंडला भेटल्यानंतर तरुणी प्रचंड रागात होती. घरी परतल्यानंतरही तिचा राग कायम होता. तिच्या बॉयफ्रेडने तिला फोनही केला होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. घरी आली तेव्हा ती कोणाशीच काही बोलत नव्हती. शांत बसून राहिली होती अशी माहिती तिच्या आईने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तरुणीची आई जवळच्याच रुग्णालयात मोलकरीण म्हणून काम करते. शनिवारी ६.३० वाजता त्यांनी घर सोडलं होतं. वडिल आणि भाऊदेखील घराबाहेर गेले असल्या कारणाने घरात तरुणी एकटी होती. रविवारी सकाळी ८ वाजले तरीही मुलगी रुमच्या बाहेर न आल्याने तिच्या आईला संशय आला. आत जाऊन पाहिलं असता मुलीने गळफास लावून घेतला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.