देशाचे जवान शहीद होताना मोदी व्यायामात मग्न.

लष्कराचे जवान औरंगजेब आणि ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणखी वाढली आहे

नवी दिल्ली: लष्कराचे जवान औरंगजेब आणि ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणखी वाढली आहे. काश्मीरमध्ये जवान, संपादकांची हत्या होत असताना पंतप्रधान मोदी मात्र व्यायामात मग्न आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली.

‘देशाचे जवान शहीद होत आहेत. पत्रकार, मजूर, विद्यार्थी मारले जात आहेत. मात्र मोदींसाठी तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे. एकीकडे जवान शहीद होताना दुसरीकडे पंतप्रधान व्यायाम करत आहेत. पंतप्रधान फिट, देश अनफिट,’ अशा शब्दांमध्ये आझम खान मोदींवर बरसले. काल लष्कराचे जवान औरंगजेब यांची हत्या करण्यात आली होती. रात्री त्यांचा मृतदेह लष्कराच्या हाती लागला. तर रात्री आठच्या सुमारास रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली.

The Kashmir Valley has more violence