पोलीस रेकॉर्डवर ‘मृत’ घोषित असलेला माणूस, भिवंडीत सापडला जिवंत.

The man, who was declared dead on the police record, was found dead in the fireplace.

पन्नालाल यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी आहे, सासरच्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी रचला बनाव

एखाद्या माणसाचा मृत्यू झाला पोलिसांनी तशी नोंद केली तर तो जिवंत सापडणे शक्य आहे का? याचे उत्तर नाही असेच येईल. मात्र नुकतीच एक अशी घटना समोर आलीये. उत्तर प्रदेशातल्या एका माणसाबाबत. पन्नालाल यादव याची पोलीस रेकॉर्डवर मृत म्हणून नोंद करण्यात आलीये. मात्र हा माणूस भिवंडीत फिरताना आढळला. त्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात २०१६ मध्ये पन्नालाल यादवला मृत घोषित करण्यात आले होते. स्वतःच्या हत्येच्या खोट्या गुन्ह्यात सासरच्या मंडळींना अडकवण्यासाठी पन्नालालने हा कट रचला होता अशीही माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशात पोलिसांनी मृत घोषित करण्यात आलेला पन्नालाल यादव मीरा रोडमध्ये राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पन्नालालचा शोध घ्यायला सुरुवात केली. पन्नालाल यादव कधी भिवंडी तर कधी मीरा रोडमध्ये फिरायचा. कधी कधी तो भाईंदरमध्येही जात असे अशी माहिती पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.

पन्नालाल यादव हा उत्तर प्रदेशातील महाराजगंजचा रहिवासी होता. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याचे त्याच्या पत्नीसह सासरच्या मंडळींसोबत वाद होत होते. या वादातूनच सासरच्यांनी पन्नालालच्या विरोधात हुंडा मागितल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पन्नालाल फरार झाला. काही दिवसांनी सासरच्या मंडळींचे आणि त्याचे पटू लागले ज्यानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली.