वटपौर्णिमेच्या दिवशी १२ सोनसाखळी चोरीच्या घटना

Twenty-seven-year-old stolen cash

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल १२ सोनासाखळी चोरीच्या घटना बुधवारी दुपारपर्यंत घडल्या आहेत

महा न्यूज नेटवर्क :-वटपौर्णिमेच्या दिवशी नटूनथटून, अंगावर सोने घालून बाहेर पडलेल्या महिलांना सोनसाखळी चोरांनी लक्ष्य केले आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल १२ सोनासाखळी चोरीच्या घटना बुधवारी दुपारपर्यंत घडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. यामुळे महिलांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना अधून-मधून सुरूच आहेत. काही सोनसाखळी चोरांना पोलिसांकडून पकडण्यात यश आले आहे. पण, पूर्ण शहरातील या घटना रोखण्यात यश आलेले नाही. बुधवारी वटपौर्णिमा असल्यामुळे पूजेसाठी अनेक महिला सोन्याचे दागिने अंगावर घालून बाहेर पडल्या होत्या. नेमकी हीच संधी सोनसाखळी चोरट्यांन साधली आहे. शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात सर्वाधिक चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा मिनिटाच्या अंतराने दोन घटना घडल्या आहेत. तसेच, वाकड, शिवाजीनगर, लष्कर, डेक्कन, कोंढवा आणि भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले, की शहरात दुपारपर्यंत आठ घटनांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. या घटनांनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे निरीक्षक व तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर गस्त घालण्यास सांगितले आहे.